Tuesday, September 4, 2007

ती आहे...

ती आहे... अळवावरचे पाणी...
जे हाती कधी लागत नाही...
आहे एक मृगजळ...
ज्याने तृष्णा कधी भागत नाही...
ती आहे... एक स्वप्न...
जे कधी सत्यात येणार नाही...
आशेचं वेडं पाखरू...

जे फिरुन घरट्यात येणार नाही...
फुलाहून नाजूक ती...
जणू चंद्राची चांद्णी आहे...
ती अस्मानीची परी...
माझ्या हृदयाची राणी आहे...

कवितेतून भेटते ती मला...
तिचे गोजिरे रूप घेऊन...
माझ्या मनातून संगीत वाहते...
शब्दांचे सुंदर साज लेऊन...

धुक्यात हरवत्या वाटेवरती...
मला ही धुंदीत राहायचे आहे...
माझ्या प्रेमाचे प्रतिबिंब...
तिच्या डोळ्यात पाहायचे आहे...

तिने यावे...चंद्र-ताऱ्यांचे पैंजण पायी लेऊन...
भ्रमराला ही धुंद करणाऱ्या...
फुलांचे सुगंध घेऊन...

ती येताच.. काळाचे धावते पाऊल...
अचानक थांबावे...ते एक क्षणाचे स्वप्न...
मी अनेक युगे जगावे...
प्रेमाची ही पाऊलवाट..
या मुशाफिराला नवी आहे...
आयुष्याच्या या वळणावर...

तिचीच साथ मला हवी आहे..फक्त...
तिची साथ मला हवी आहे..

4 comments:

KavitaK said...

Heyyyyyyyyy nice poem Sat,
really I think this guy has expressed his real feelings through this poem because i know him and he is exactly like this poem a nice person.
so girls just get ready to track him.

Nilesh said...

Khupach Surekh Varnan kel ithe mazya mitrani eka sundarshya mulibaddal.....wahhhh

Sudhir said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

".......It's Incredible......."